बाप्पाला पत्र (Letter to Bappa)

Note: On the occasion of Ganesh Chaturdashi (Ganesh Visarjan) i.e., Hindu Festival, I am writing a letter to my beloved God, Bappa Moraya.

And this letter is about whatever is happening around us on earth, some social and some issues created by all of us are discussed in this letter with bappa and that’s all in this blog. Please try to read. 

निघालास ना बाप्पा तु? का रे चाललास इतक्या लवकर? थांबायच ना आणि जरा दिवस आमच्यासोबत इथेच… इतकी घाई का? एक तर वर्षातून एकदा यायच आणि मग अवघ्या दहा निवसात निघूनही जायचं! बर असो आता जातोयस, जा तु! तिकडे सगळे तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतील ना, पण पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा!

येता-जाताना तुला ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषणाला फारच सामोरे जावे लागतय, त्यात लोकांचा तुझ्याबद्दलचा उत्साहच आहे रे पण त्याना तुलाच समजवावे लागेल हे आता कि तुला तुझ्या नावाखाली होणारा तो दंगा, गोंधळ, प्रदुषण याचा फारच त्रास होतो.

आणि हो, मला कळतय इथे घडत असलेल्या भ्रष्टाचार, बलात्कार, आत्महत्या, आतंकवाद, देशादेशांतील युद्ध या अशा बर्याच सामाजिक समस्यांमुळे तु फार फार चिंताग्रस्त देखील झाला असशील, पण आता तुच एक शेवटची आस आहेस बाप्पा, तु विघ्नहर्ता आहेस बाप्पा! जाता जाता या सर्व विघ्नांचा नाश करुन जा आणि सर्वाना सदबुध्दी लाभू देत.

तुझ्या पुढच्या खेपेला तुला अकरा दिवसात जायची इच्छाच होणार नाही इतके सुंदर होउ देत सारे आणि आम्हा सर्वाना हे जग सुंदर करण्यात आणि सुंदरता कायम ठेवण्यात हातभार लावता येईल इतकी शक्ती दे देवा!

शेवटची नम्र विनंती, या भेटीस तुझ्या स्वागतात आणि तुझ्या सेवेत माझ्याकडुन किंवा मा झ्या लोकांकडून काहीही चूकभूल झाली असेल तर माफी द्यावी देवा!

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी!

आम्ही तुझी वाट बघु, पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा! 😘

बाप्पा बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया!

-सुवर्णा (मेघा)

Advertisements

25 thoughts on “बाप्पाला पत्र (Letter to Bappa)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s