रिशा…

आपल्या वाढदिवसादिवशी कुणाला दिवसाचे २४ तास पुरतात बरे! मला सुद्धा नव्हते पुरले, काही जवळच्या माणसाना भेटणे राहिले होते आणि म्हणुनच सकाळी १० च्या सुमारास मी घरातुन निघाले माझ्या अशाच एका जवळच्या मैत्रिणीकडे जायला. विशेष म्हणजे तेव्हा ती नउ महिन्याची गरोदर होती, डोक्टर ने सप्टेंबर महिन्याची तारीख दिलेली म्हनुन ती ही अगदी निवांत! अन गौरीच्या चिमुकलीची खोड बघा… दिला कि आईला मेसेज, “सप्टेंबर नाही, आजच येतेय मी, तयारीला लागा…!” 

सगळे तिला घेउन असलेल्या अवस्थेत होस्पिटल ला निघाले, मी ही घाईघाईने घराऐवजी होस्पिटल्कडे वळाले, होस्पिटल मध्ये गौरी आत वेदनेने विव्हळत होती आणि आई बाहेर भरल्या डोळ्यांनी मुलीचा हा त्रास लवकर थांबव रे म्हणून देवाकडे विनवण्या करत बसली होती. मी कसेबसे त्यांच्याजवळ जाउन त्याना धीर देउ लागले, त्यांना गौरी ला एकटे ही सोडवत नव्हते आणि तिचा त्रास ही बघवत नव्हता, मग मीच जबाबदारपणे  म्हटल, “मी जाते तिच्याजवळ, तुम्ही काळजी करु नका” आनि मि तिच्याजवळ जायला निघाले, गौरी फारच त्रास सहन करत होती, तिला एवढ्या त्रासात पाहून मी भलतीच घाबरली होती, अगदी काटा आला होता माझ्या अंगावर, आणि किंचित थरथरत, आसवे थांबवत मी पुढच्याच क्षणी तिथुन बाहेर निघाले! 

तिची आई माझ्या येण्याकडे डोळा लाउनच बसली होती, तसेच मी ही बाहेर आल्या आल्या त्याना भेटली, जड मनाने त्याना  धीर देत कसबस शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण खरेतर ते सर्व पाहुन मीच फार जास्त घाबरुन गेली होती आणि तेव्हा पहिल्यांदा मला जाणीव झाली कि “आई” होणे इतके सोपे ही नव्हे, “मातृत्व” या शब्दाचा परिपूर्ण अर्थ मी त्यादिवशी जाणवला…
काही वेळाने आमच्याजवळ एक गोड बातमी आली, गौरीच्या गोंडस चिमुकलीच्या येण्याची! आणि आम्ही सगळे आनंदाने बागडु लागलो! 

मग आम्ही तिला पहिल्यांदा पाहिले, खेळवल…

माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी तिथे गेली आणि बरेच काही शिकुन, काही गोड आठवणी मनात साठवून परतीच्या दिशेने निघाली! तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस असेल नेहमीच!
आणि आज आमची चिमुकली “रिशा” एका वर्षाची झालीय…

खूप आठवणी आहेत तिच्यासोबतच्या, तिला बसायला ही नाही यायच तेव्हा मी तिला चुकुन बसवलेल आणि ती धडपडलेली! 😅

आता गोंडु ऱिशु हळुहळु चालु लागलेय, बोलू लागलेय! अशीच मोठी हो आणि मग गौरीला खुपखुप त्रास दे बरे का!😘

मी तुझ्या पहिल्या वाढदिवसाला नसणार आहे पण कदाचित माझी ही आठवण तु मोठी होवुन वाचशिल आणि तुला कदाचित आवडेल ही! 
Happy Birthday Risha😘
-सुवर्णा (मेघा ताई)❤

Advertisements

16 thoughts on “रिशा…

  1. Happy birthday Risha…Khup god ahe ti..

    Jar mi chuklo nasel tar aaj tuzahi bday asnar…barobar na??

    Tulahi vadhdivsachya khup khup shubhechhya Megha….
    (Jar nasel aaj..tari advance madhe thev ya wishes 🙂 )

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s