दादा… 

दादा…

दादा…
सुखदुखात सोबत करणारा,                          
पण चुकले काही तर चिडवणारा, 

चिडवुन चिडवुन रडवणारा,

मग रडल्यावर एखादा पाणचट जोक मारुन पुन्हा हसवणारा,

अप्सेट असला कि सगळा राग आमच्यावर काढणारा,

मग चिडुन भांडुन झाल कि स्वताच लाडीगोडी लावणारा,

कधी काही चुकले की खडसावुन ओरडणारा,

अन तीच चुक पुन्हा होवू नये म्हणुन शंभर वेळा समजवणारा, 

अभ्यास करा अभ्यास करा म्हणुन मागे लागणारा,

पण नुसताच अभ्यास नको तर खुप खुप मजा पण कर असं म्हणणारा,

आमच्यातले वाइट गुण आम्हाला स्पष्टं सांगणारा,

आणि आमचे चांगले गुण जगासमोर अभिमानाने मांडणारा,

आमच्यावर नेहमी विश्वास ठेवणारा,

आणि गरज पडली तर आमच्यातला विश्वास जागवणारा…

दादा…
तु आमच्या आयुष्यातली सर्वात अनमोल ठेव…
तु असताना दुसरा कुणी आदर्श कशाला हवा? 

आयुष्यात आजवर खुप काही घडले बिघडले…

पण तु मात्र नेहमी सोबत होतास आणि बाकी कुणी असो नसो तु नेहमी असशील हा विश्वास आहे…

Thank you so much for being there with me on every path of my life…

Happy Rakshabandhan!😘❤
– सुवर्णा (मेघा) 

Advertisements

11 thoughts on “दादा… 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s